NVGT Care Services Pvt Ltd is one of the largest administrative service provider of health care over the country. NVGT CARE SERVICES PVT LTD are large, bustling care organization that provide essential supporting, healthcare administrative services, Government health plan, international support, claims management, home health care, transitions from hospital/facility to home, health check up in Health care business unit. NVGT CARE SERVICES PVT LTD is providing non-Insurance base Health Schemes.
Our mission is to bring exceptional health care with innovation and compassion to enhance the quality of life as well as improve the health of those we serve with a commitment to excellence in all that we do.
Our goal is to offer quality care and services that set community standards, exceed patient’s expectation and are provided in a caring, convenient, cost-effective and accessible manner.
Our goal is to offer quality care and services that set community standards, exceed patient’s expectation and are provided in a caring, convenient, cost-effective and accessible manner.
Subscribe our news letter
🙏🏻आभार....🙏🏻 दिनांक १४/०९/२०२३ रोजी माझ्या वडिलांच्या छातीत , पाठीमधे आणि श्वसनाच्या त्रासाने अचानक पणे तीव्र वेदना होत होत्या... त्या दरम्यान मला काहीच सुचत नव्हते... की त्यांना कोणत्या दवखण्यात न्यायचे, कॅशलेस सुविधा उपलब्ध असेल की नाही, माझी पॉलिसी पण नाही या आणि अशा प्रचंड प्रश्नांनी माझ्या डोक्यात काहूर माजले असताना श्री विशाल नरोटे भाऊसाहेब यांच्या सोबत संवाद झाला त्यांनी अतिशय शांत पने माझे ऐकून घेऊन क्षणातच NVGT पॉलिसी काढून सुविधा सुरू करून दिली, सबब या अशा अचानक उद्भवलेल्या प्रसंगात त्यांनी मानसिक आणि आर्थिक मदत केली आणि माझ्या वडिलांचा उपचार कॅशलेस सुविधे मधून करण्याबाबत श्री विशाल नरोटे भाऊसाहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचा माझ्याशी संपर्क झाला नसता तर आज मी कदाचित वेगळ्या परिस्तिथीत असतो, परंतु देवच वेळेवर आपल्याला चांगल्या माणसांच्या सानिध्यात पाठवून देण्याची व्यवस्था करतो आणि माझ्यसाठीही श्री विशाल नरोटे हे देवा सारखे च धाऊन आले... एका दिवसात एवढी सगळी arrangement त्यांनी फक्त एका ते दोन तासांचे आत करून दिली त्याबाबत त्यांचा मी कायम शतशः ऋणी राहील... आई भवानी कृपेने आपणास व आपल्या परिवारास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्रचरणी प्रार्थना...🙏🏻 आपला कृपाभिलाशी... (प्रशांत अर्जुन आस्मर) दिवाणी व फौजदारी न्यायालय अकोले जि अहमदनगर
नमस्कार मी श्री अनिल दामू नागरे(उच्च माध्यमिक शिक्षक ) मा वि. प.उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा, मी NVGT CARE चा सभासद म्हणून नोंदणी केली त्या अंतर्गत त्यांनी मला संपूर्ण मेडिकल तपासणी मोफत दिली. नाशिक मध्ये नामवंत हॉस्पिटल मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये वैदयकीय तपासणी सुविधा उपलब्ध करुन दिली तसेच तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात नियमित वैद्यकीय तपासणी तसेच मार्गदर्शन खूप गरजेचे आहे त्या साठी NVGT CARE टीम खूप चांगले मार्गदर्शन तसेच सहकार्य करते. खूप खूप धन्यवाद NVGT CARE श्री अनिल दामू नागरे 8108751616 (उच्च माध्यमिक शिक्षक ) मा वि. प.उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा तालुका : त्रंबकेश्वर, जिल्हा: नाशिक
मी श्री ज्ञानेश्वर किसन माळोदे, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक येथे सीआरटी मजुर या पदावर सेवेत आहे. एन व्ही जी टी केअर सर्विसेस प्रा. ली यांच्याकडे मागील २ वर्षापासून सभासद असून मागील काही दिवसापासून मला पायाचा त्रास जाणवत होता. त्या मुले सहज श्री विशाल नरोटे व सचिन गडाख यांना संपर्क साधला व माझ्या आजाराबद्दल कळविले. त्यांनी मला कासलीवाल सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये आंतरुग्न म्हणून उपचार घेण्यास सांगितले. डॉ. विशाल कासलीवाल सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चाचण्या केल्या असता पायाचा आजार गंभीर स्वरुपात बळावलेला जाणवला. त्यांनी आवश्यक ती शस्त्रक्रिया केली. आज मी चांगल्या प्रकारे चालू शकतो. दिलेल्या चांगल्या प्रतीच्या उपचारासाठी मी डॉ. विशाल कासलीवाल सर व कॅशलेश साठी एन व्ही जी टी केअर सर्विसेस प्रा. ली यांचा खूप खूप आभारी आहे. एन व्ही जी टी केअर सर्विसेस प्रा. ली यांच्या मुले आज पर्यंत कोरोना साठी, पत्नीच्या स्पायनल कॉड च्या आजारासाठी व आता पायाच्या दुखण्यासाठी खूप मदत झाली. मी एन व्ही जी टी केअर सर्विसेस प्रा. ली सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आपणा देखील एन व्ही जी टी केअर सर्विसेस प्रा. ली च्या आरोग्य योजनेत सहभागी होऊन आपले जीवन सुरक्षित करावे हि विनंती !!! ज्ञानेश्वर किसन माळोदे नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक सीआरटी मजुर
मी अनिल फुलपगार, निवडणूक शाखा - जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे कार्यरत असून काही महिन्यापूर्वी NVGT CARE SERVICES PVT LTD यांची हेल्थचेकउप अंतर्गत कॅशलेश योजनेत सभासद झालो. अचानक ०६ मार्च रोजी माजी मुलगी आराध्या हिची प्रकृती बिघडल्याने एन व्हि जि टी केअर यांच्या मार्गदर्शना खाली अकोलकर हॉस्पिटल अहमदनगर येथे भरती करावे लागले. सदर हॉस्पिटल हे एन व्हि जि टी केअर यांचे नेटवर्क हॉस्पिटल होते. त्यामुळे उपचाराकरिता लागणारा खर्च हा कॅशलेश स्वरुपात झाला. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळले गेले. त्या मुले मी एन व्हि जि टी केअर कंपनी तसेच तेथील सभासद यांचे फार आभार व्यक्त करतो. सदर सर्व्हिस खूपच चांगली वाटली तसेच माझ्या मुलीला ऍडमिट केले असता माझे एजंट यांनी मला दवाखान्यामध्ये खूप सहकार्य केले याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद.
माझे नाव श्री.दिनेश दशरथ परदेशी असून मी मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना (जलसंपदा) ता.जि.नाशिक येथे आरेखक या पदावर कार्यरत आहे. मी एन व्ही जि टी केअर सर्विसेस प्रा.लि या कंपनीच्या कॅशलेश योजनेत तीन वर्षापासून सभासद आहे. गेल्या काही दिवसा पूर्वी माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना हॉस्पिटल मध्ये एडमिट करणे गरजेचे होते. मी तत्काळ एन व्ही जि टी केअर सेर्विसेस कंपनीचे प्रतिनिधी श्री विशाल नरोटे यांना संपर्क साधला. त्यांनी तत्काळ माझ्या वडिलांस “सदगुरु मल्टीस्पेशालटीहॉस्पिटल, आडगाव नाका,पंचवटी नाशिक” येथे दाखल होण्यास सांगितले. सदगुरु हॉस्पिटल हे एन व्ही जि टी केअर कंपनीचे नेटवर्क हॉस्पिटल असल्यामुळे वडिलांचा उपचाराचा सर्व खर्च हा कॅशलेश स्वरुपात झाला. त्यामुळे माझ्या वडिलांचा उपचार अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला. सदर योजना कॅशलेस असल्यामुळे आर्थिक ताण देखील जाणवला नाही. मी श्री.विशाल नरोटे व सचिन गडाख यांचे व एन व्ही जि टी केअर कंपनीचे संपूर्ण टीम चे खूप आभारी आहे. आपण देखील सदर योजनेत सहभागी होऊन आपले कुटुंब सुरक्षित करावे हि विनंती...
माझे नाव,वैशाली रविंद्र जाधव ,रहाणार आश्रमशाळा वाघेरा, मी एन,वि,जी,टी केअर यांचे खूप खूप आभारी आहेत.कारण माझे पती रविंद्र जाधव यांची अचानक तबेत बिघडली ,कठीण प्रसंग असताना त्यांना दि।13/11/2021 रोजी मग्नम हौस्पीटल मध्ये ऍडमिट केलं गेलं, परंतु एवढ पैसा येणार कुठून ,कठीण प्रसंगात काही सुचेना,परंतु आपण एनवीजिटी हेल्थ केअर ची आपण पॉलिसी काढली आहे ,हे आठवतच श्री निलेश कुंदे याचे मार्गदर्शन घेतले ,हेल्थ केअर चे कार्ड दाखवताच मग्नम मध्ये उपचार होईल असं डॉ नि सांगितलं , माझे पती एनविजिटी हेल्थ केअर च्या सहकार्याने एक रुपया न देता उपचार झाले,आज रोजी माझे पतीची तबेत बरी आहे ,मी NVGT हेल्थ केअरची मला खूप मदत झाली आहे .मी खूप खूप आभारी आहे, तसेच श्री निलेश कुंदे याची पण खूप आभारी आहेत🙏🙏
*अभिप्राय* सस्नेह नमस्कार, मित्रानो १९ व्या शतकात अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा होत्या मात्र २१ व्या शतकात शिक्षण आणि आरोग्याची भर पडली त्यात आपल्या सर्वांचा संवेदनशील विषय म्हणजे आरोग्य.आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात अगदी लहान थोरापासून ते अबालवृद्धांपर्यंत वाढत असलेल्या आरोग्याच्या तक्रारी,कमी वयातच जडलेले विकार,वातावरणातील बदल,बदलती जीवनशैली,मानसिक ताणतणाव आणि वाढती व्यसनाधीनता या मुळे माणसाचे आरोग्य हे काचेच्या भांड्यासारखे झालेले आहे त्यामुळे ते आजारपण येऊन कधी फुटेल हे सांगता येत नाही त्यात सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबाना गंभीर आजाराशी निगडित न परवडणारा वैद्यकीय खर्च या मुळे आरोग्याचा प्राधान्यक्रम ठरवताना सामान्य आणि मध्यमवर्गीय माणसाची अवस्था सदैव चिंताग्रस्त असते परंतु *NVGT care service च्या माध्यमातून ही चिंता कायमची मिटल्याचा मनस्वी आनंद माझ्या सारख्या अनेकांना झाला आहे..!* मी नरेंद्र वसंत डेर्ले (शिंगवे, ता.निफाड) मला नुकतंच काही दिवसांपूर्वी अचानक थंडीताप,डोकेदुखी,सांधेदुखी आणि अशक्तपणा जाणवू लागला covid च्या वातावरणामुळे मी घाबरून गेलो आणि काय करावे यात चिंतामग्न झालो त्यातच मला NVGT care च्या श्री.नरोटे सर आणि गडाख सरांना फोन केला त्यांनी लगेच त्याची दखल घेत मला blodd test करण्याचा सल्ला दिला आणि रिपोर्ट आल्या नंतर लगेच संपर्क साधण्यास सांगितला.report केले असता त्यात टायफॉईड आणि पेशी कमी असल्याचे निदान झाले आणि मी लगेच नरोटे सर आणि गडाख सरांना फोन केला आणि रिपोर्ट संदर्भात अवगत केले.त्यांनी मला माझा पत्ता विचारला आणि जवळच्या रुग्णलायात उपचाराची तुमची व्यवस्था करून देतो अशी शास्वती दिली.१० मिनिटा मद्धे सरांचा फोन आला आणि त्यांनी मला पंचवटीतील सद्गुरू हॉस्पिटल मद्धे जाऊन admit होण्यास सांगितले मी त्वरित admit झालो. *हॉस्पिटल मद्धे गेल्यानंतर reception counter वर अगदी 5 मिनिटात admit होण्या साठीची प्रक्रिया पूर्ण केली आणि हॉस्पिटल प्रशासनाने मला admit करून घेतले यात मला NVGT care serv. च्या नरोटे सर आणि गडाख सर यांनी खूप follow up घेतला त्यामुळे मला admit होण्याच्या प्रक्रियेत कुठलीही दिरंगाई* वाटली नाही. उपचार सुरू झाल्यानंतर ही *श्री.नरोटे सर आणि गडाख सर यांनी वेळोवेळी विचारपूस केली त्यामुळे उपचार घेताना कुठलाही वाईट अनुभव नाममात्र सुद्धा आला नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझा सर्व खर्च कॅशलेस* झाला.इथून मागे mediclaim क्षेत्रात एवढी तत्परता आणि काळजीवाहुपणा कुठेही अनुभवायला मिळाला नाही. *अस म्हणतात सेवा परमोच्च धर्म याचा शास्वत प्रत्यय मला NVGT care services च्या माध्यमातून आणि सेवा देणारी माणसे तर त्याहूनही कार्यतत्पर निघाली म्हणून कर्तृत्वाची जाणीव आणि दातृत्वाच देण असलेल्या NVGT care services चा सदस्य असल्याचा मला नक्कीच अभिमान वाटतो म्हणून आपण NVGT care services,सद्गुरू हॉस्पिटल प्रशासन आणि श्री.नरोटे सर आणि गडाख सर यांचे मनस्वी आभार मानतो..!* *श्री.नरेंद्र वसंत डेर्ले* (मराठा विद्या प्रसारक समाज,नासिक)
नमस्कार, ”माझे नाव श्री प्रभाकर महादू वाघ असून मी म.वि.प्रसारक समाजाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय,नाशिक येथे प्राणी ग्रहपाल या पदावर कार्यरत आहे. मी एन व्ही जि टीकेअर सर्विसेस प्रा.लि या कंपनीचा दोन वर्षापासून सभासद आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माझी अचानक तब्येत खराब झाली होती.व मला हृदयरोगाचा तीव्र झटका आला होता. त्या मुळे कुटुंबातील सर्व व्यक्ती घाबरून गेले आणि अति तत्काळ ग्लोबल मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल,सिडको येथे दाखल केले. तसेच हृदयरोगाचा आजार म्हणजे रक्त पातळ करण्यासाठी लागणारी महागडी औषधे आणि शिवाय हॉस्पिटल चा खर्च त्या मुळे माझे कुटुंबातील व्यक्ती मानसिक तणावात होते. पण माझ्या कडे एनव्हीजिटी केअर सर्विसेस प्रा लि यांचे कॅशलेस योजनेतील कार्ड होते आणि ग्लोबल मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल,सिडको हे त्यांचे नेटवर्क हॉस्पिटल होते. त्या मुळे त्वरित कॅशलेस उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले असता. सर्व आजारावरील खर्च हा कॅशलेस सेवेत झाला. दोन तीन दिवसांनी माझ्या वर ANGIOGRAPHY चाचणी केली असता त्यात हृद्य रोगाची शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली. त्या मुळे एन व्ही जि टी केअर चे प्रतिनिधी श्री विशाल नरोटे व श्री सचिन गडाख यांच्या मार्गदर्शनाने म्यग्नम हार्ट इन्स्टिटयूट नाशिक येथे हृद्य रोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली. आज मी एनव्हीजिटी केअर सर्विसेस प्रा लि चे सर्व प्रतिनिधी, ग्लोबल मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल,सिडको, म्यग्नम हार्ट इन्स्टिटयूट नाशिक यांचे धन्यवाद मानतो. त्यांच्या मुळेच नवीन जीवनाचा आनंद मला आज घेता येणे शक्य झाले आहे. आपणा देखील आपले कुटुंब सुरक्षित करण्यासाठी आजच एनव्हीजिटी केअर सर्विसेस प्रा लि यांचे सभासदत्व घावे व आपले कुटुंब सुरक्षित करावे हि विनंती..... आपला विश्वासू प्रभाकर महादू वाघ ( मो.८२७५०२३७९३ )
एन व्ही जि टी केअर नाशिक टीम व त्यांचे प्रतिनिधी निलेशजी आपल्या मुळे मी माझे आई वडील यांची सेवा करू शकलो.तुम्ही वेळेवर केलेल्या सहकार्यामुळे मी माझे आई आणि वडील यांची निरामय हॉस्पीटल येथे उपचार करून त्यांना या महामारीचे आजारातून मुक्त करू शकलो.परमेश्वर आपणास चांगल्या कामासाठी यश देवो.ही सदिच्छा धन्यवाद निलेश कुंदे दत्तात्रय चंद्रभान घुगे. नाशिक रोड.
एन .व्ही .जी .टी केअर तसेच एन. व्ही. जी . टी. केअर कंपनीतर्फे नाशिक जिल्ह्यात कार्यरत असलेले हेड एक्झिक्यूटिव्ह श्री निलेश कुंदे यांचा मी व्यक्तिशः ऋणी आहे. दिनांक 1/4 /2021 रोजी कोरणा पॉझिटिव्ह असल्यामुळे मला नाशिक येथे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचे होते. तसे पाहता कोरोणा ग्रस्त रुग्णांची संख्या नाशिक जिल्ह्यात वाढत असल्यामुळे नाशिक येथे हॉस्पिटल मध्ये बेड मिळणे कठीण होते. अशाही परिस्थितीत श्री निलेश कुंदे यांनी रामालय हॉस्पिटल, कारंजा नाशिक येथे माझ्यासाठी स्वतंत्र रुमची बेडसह व्यवस्था डॉक्टरांशी संपर्क करून दिली. तसेच वेळोवेळी डॉक्टरांशी संपर्क करून मिळणाऱ्या उपचाराची माहिती घेतली. श्री निलेश कुंदे यांच्या केलेल्या प्रयत्नामुळे दिनांक 6/4/21 रोजी मी कोरोना आजारावर मात करून घरी आलो. यानंतर देखील वैद्यकीय खर्च ची फाईल हॉस्पिटलकडून तयार करून घेणे त्या संबंधी लागणारे सर्व कागदपत्रे हॉस्पिटल्सच्या कार्यालयाकडून तयार करून घेण्यासाठी श्री कुंदे यांनी एन व्ही जी टी केअर तर्फे अतिशय वाखाणण्याजोगे काम केलेले आहे. मला केलेले सहकार्य तसेच वैद्यकीय बिलाची फाईल तयार करण्यासाठी केलेले अथक प्रयत्नाकरिता मी एन व्ही जी टी केअर कंपनीचा तसेच श्री निलेश कुंदे यांचा व्यक्तिशः आभारी आहे. आपल्या कंपनीकडून असेच चांगले कार्य भविष्यात घडत जावो ही शुभेच्छा. श्री निलेश कुंदे आपणास भावी कार्यासाठी अनेकानेक शुभेच्छा व अभिनंदन. श्री ए जी तांबोळी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग सटाणा, नाशिक
नमस्कार माझे नाव- महेंद्र चिंतामण उबाळे,असून मी जिल्हा न्यायालय,मालेगाव जिल्हा नाशिक येथे मी कार्यारत असून माझ्या आईला गेल्यां काही दिवसांपूर्वी मुत्रपींडाचा आजार झाला होता व माझ्या आईचा ह्या आजारपणाचा खर्च हा खुप प्रमाणात झाला होता व त्यामुळे मी खुप मानसिक तणावाखाली होतो व मला ऐन.व्ही. जी.टी.करे सर्विहसेस बद्दलची सर्व प्रकारची माहिती श्री.विशाल नरोटे सर यानी खुप चांगली दिली व त्यांनी मला या संदर्भात खुप मदत केली माझ्या आईच्या मुत्रपींडाच्या संपुर्ण खर्च ऐन.व्ही. जी. टी.केरचे विशाल नरोटे सर मला कार्यालया मार्फत पारित करुन देणार आहे. ऐन.व्ही. जी.टी.केर कंम्पनीने चे सहकार्य खुपच चांगले व वाखने जैसे आहे. मी मनापासून श्री.विशाल नरोटे सर व सर्व कंम्पनीचा शतशा आभारी आहे. आपला विश्वासू श्री.महेंद्र उबाळे मो नं :- 9960110652
सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी NVGT health care services ही संस्था अत्यंत प्रभावीपणे काम करीत असून संस्थेच्या सेवेचा सर्व शासकीय कर्मचारी/अधिकारी यांनी लाभ घ्यावा. संस्थेच्या वतीने खाजगी रुग्णालयात कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध असून याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. कोणत्याही इन्शुरन्स कंपनी च्या TPA पेक्षा NVGT चे काम अत्यंत चांगले असून संस्थेचे सर्व स्तरावर एकूण कामकाज प्रशंसनीय आहे. सर्व शासकीय कर्मचारी /अधिकारी यांनी NVGT चे सदस्य होण्यास हरकत नाही.
Overall service is good and staff behavior is also good & polite, it make process fastly and cary which is useful for government servant. Mo. 850201710
माझ्या मुलींच्या (दिव्या व रिया) उपचारासाठी कॅशलेस सेवेचा लाभ मला प्रकाश चिल्ड्रेन केअर हॉस्पिटल जळगाव येथे मला मिळाला.
माझी पत्नीच्या उपचारासाठी वसंतप्रभा हॉस्पिटल बुलढाणा येथे कॅशलेस सेवेचा लाभ मिळाला. -२४/०६/२०१९